Friday, 12 June 2015

माझ्या प्रत्येक यश्यात अर्धा नव्हे तर संपूर्ण वाटा यांचाच आहे....

माझ्या प्रत्येक यश्यात अर्धा नव्हे तर संपूर्ण वाटा यांचाच आहे....

मला मिळालेला अत्यंत प्रतिष्ठेचा आणि राज्यस्तरीय असा यशवंतराव चव्हाण कृष्णाकाठ भूषण कृतज्ञता गौरव पुरस्कार स्वीकारताना माझी पत्नी सौ. गंगा आणि माझा मुलगा चि. अंतरीक्ष....

या कार्यक्रमाच्या वेळी मी एका शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करत असल्यामुळे मी तेथे उपस्थित राहू शकलो नाही याबद्दल खेद वाटतो परंतु या पुरस्काराचे खरे मानकरी तेथे उपस्थित राहिले व त्यांनीच माझ्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला याचा आनंदही आहे

माऊली कुटुंबप्रमुख प्राचार्य डॉ. गिरीश पठाडे, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सलीम भैया मुजावर आणि प्रमुख कार्यवाह प्रा.हनमंत कराळे पाटील यांचा मी आभारी आहे या सन्मानाने माझी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा व उर्जा नक्की वाढेल यात शंका नाही....

Wednesday, 10 June 2015

'ब्लॉग रायटिंग'ने टाकली कात (व्यंकटेश कल्याणकर)

फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात "ब्लॉग रायटिंग‘ मागे पडते की काय, असे वाटत होते. मात्र, प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. प्रदीर्घ लेखन ऑनलाइन करण्याचे नवे माध्यम म्हणून "ब्लॉग रायटिंग‘ पुन्हा नव्याने समोर येत आहे. 

- व्यंकटेश कल्याणकर

व्हॉट्‌सऍपच्या जमान्यात आपल्याला दररोज अनेक मेसेजेस येत असतात. त्यामध्ये कधी कधी प्रदीर्घ लेखही फॉरवर्ड केले जातात. हे लेख येतात कुठून, एवढे मोठे लेख लिहितात कोण; तर हे जे लेखक मंडळी असतात ते बहुतेकवेळा "ब्लॉगर्स‘ असतात. ऑनलाइन माध्यमांत ब्लॉगवर लेखन करणाऱ्यांना "ब्लॉगर्स‘ म्हणतात. किरकोळ मर्यादा सोडल्या तर संकेतस्थळ आणि ब्लॉगमध्ये फार फरक नाही.

गुगल, वर्डप्रेससारख्या माध्यमातून आपण अगदी तासाभरात आपला ब्लॉग सुरू करू शकतो. आपल्या हव्या त्या विषयावर अभिव्यक्त होण्यासाठी ब्लॉग हे प्रभावी माध्यम आहे. जी-मेलचा ई-मेल आयडी वापरून आपण गुगलच्या "ब्लॉगर‘ सेवेद्वारे स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकतो. एका ई-मेलवरून आपण अनेक ब्लॉग तयार करू शकतो. एका ब्लॉगवर अनेक लेख लिहू शकतो.

ब्लॉगिंगची सेवा नि:शुल्क उपलब्ध आहे. याशिवाय ब्लॉगला भेटी देणाऱ्या "व्हिजिटर्स‘च्या संख्येवरून जाहिरातीही मिळू शकतात. गुगल ऍड्‌सच्या माध्यमातून मिळणाऱ्या जाहिरातीतून उत्पन्नही उपलब्ध होऊ शकते. मराठी भाषेत ही पद्धत अद्याप फारशी प्रचलित नाही. मात्र, पाश्‍चिमात्य देशात ब्लॉगिंग हा मोठा व्यवसाय झाला आहे. अगदी कथा, कविता, राजकारण, साहित्य, पाककृती, पर्यटन आदी विषयांवरचे ब्लॉग्ज्‌ लोकप्रिय आहेत. 

मराठीमधील ब्लॉग्ज्‌वर दर्जेदार साहित्य प्रकाशित होत राहते. प्रसार आणि प्रचाराअभावी "मराठी ब्लॉगर‘ अद्यापही काही अंशी दुर्लक्षितच आहे. मात्र, अलीकडच्या काळात राजकीय विषयांवर काहीतरी खळबळजनक लिहिणारे ब्लॉगर अल्पावधीतच लोकप्रिय होत असल्याचे चित्र समोर येत आहे.
ब्लॉग लेखनामध्ये अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये खासगी ब्लॉग, समूह ब्लॉग, संस्थेचे ब्लॉग वगैरे प्रकार करता येतात. विशेष म्हणजे फेसबुक, ट्‌विटर वगैरे म्हणजे एक प्रकारचे ब्लॉगिंगच आहे. ते मायक्रोब्लॉगिंग प्रकारात मोडते. ब्लॉगची लोकप्रियता वाढली, तर आपण विहित शुल्क अदा करून आपल्या ब्लॉगला संकेतस्थळात परावर्तित करू शकतो.

जॉन बर्गर यांची वेबलॉगची संकल्पना
जॉन बर्गर यांनी 1990 मध्ये वेबलॉग ही संकल्पना आणली. पुढे तीच ब्लॉग म्हणून नावारूपास आली.
दररोज विशिष्ट व्हिजिटर्सचा आकडा गाठला की ब्लॉगला गुगल ऍड्‌स मिळतात. अधिकृत शासकीय ब्लॉग तयार करणारा इस्राईल हा पहिला देश आहे. पाश्‍चिमात्य देशात वैयक्तिक ब्लॉगिंग हा मोठा व्यवसाय आहे.

ब्लॉग बाबत काही प्रश्न अडचणी असतील तर आपण लेखकाला +91-94042 51751 या क्रमांकावर केवळ Whats App द्वारे प्रश्न विचारू शकता. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यात येईल. (केवळ Whats App द्वारे) 

(Courtesy: www.esakal.com)

Tuesday, 26 May 2015

एक अधूरा ख्वाब

" रोज दफ़्तर से लौटते वक़्त, 
चौखट पर बैठा हुआ मिलता था
वो कभी मुस्कुराता, कभी कुछ बुद-बुदाता, 
कभी खामोश, और कभी बेचैन सा 
वही बैठता था, मेरी चौखत पर
कौन था? पहचान नही पा रहा था उसे
सोचा पूँछू, करीब जाकर
लेकिन बचता रहा हमेशा
आज लौटा जब दफ़्तर से,
देखा बैठा था वह वही , 
थोड़ा उदास था, आँखें कुछ नम सी थी
हिम्मत कर करीब गया 
पूँछा उसे " कौन हो? "
कोई जबाब नही दिया उसने
बस एक बार देखा मेरी ओर 
और बस देखता रहा
फ़िर पुँछा मैने '' कौन हो? " 
नीद से जागा जैसे वह
बोला " पहचाना नही मुझे , 
मै तुम्हारा  एक अधूरा ख्वाब , भूल गये क्या मुझे "
मेरा एक ख्वाब ! , एक सवाल , 
एक बेचैनी सी होने लगी , 
कब देखा था, इस ख्वाब को 
और पहचान नही पाया, मिलता तो रोज था
हौसला कर ,हाथ बढ़ाया 
छुआ उसे
और ख्वाब हक़ीक़त हो गया "
                                         - " हैदर "


Thursday, 30 April 2015

पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


पहिला वाढदिवस चिमूचा...!!!


बघता बघता एक वर्ष संपलं... जणू काही ३६५ दिवसाचं एक स्वप्न पूर्ण झालं... चिमू तू आलीस आणि आमचं आयुष्य जणू फुलून निघालं... या एका वर्षात तू पुढील पूर्ण आयुष्यात आम्ही कधीही विसरणार नाहीत अश्या सुंदर आठवणी आम्हांला दिल्यास... तुझ ते टकमक पाहणं... तळहाताच्या मुठी आवळून हातवारे करणं... तुझं ते खरं रडणं आणि कधी कधी नाटकी रडणं... जवळ घेताच शांत होणं... तुझं ते कीडबिड बोलणं आणि वर्षाच्या आतच तुझं चालण्याच्या प्रयत्नात पडणं... सगळं काही मनमोहक मधुर अन कधी न विसारणारं...
           क्षितिजा... खरच तू रडत असतानाही मला हसावं वाटलं कारण तुझ रडणही तसच हळुवार आणि लाडिक होतं... तुझ्या प्रत्येक कृतीच्या आणि केलेल्या नखर्यांच्या पाऊलखुणा आमच्या मनावर उमटलेल्या आहेत... या एका वर्षात अनेक सुखद क्षण येऊन गेले ज्यांची मोजदाद होऊच शकत नाही... मोजदाद करण्याचा प्रयत्नही मी करणार नाही कारण मोजण्यापेक्षा जे उपभोगले तेच खरे आनंदाचे क्षण... हो या एक वर्षातील तुझ्यासोबतचे सर्व क्षण मी मनाच्या एका कोपर्यात कायमस्वरूपी कैद करून ठेवले आहेत... त्या गोड आठवणी आहेत माझ्यासाठी... माझ्या पुढील आयुष्यासाठी...
           चिमू तू हळूहळू तुझी एकेक लीला दाखवत आहेस आणि आम्ही ते पाहून हरखून जात आहोत... हातांच्या इशार्यासह तुझे पापा, बाबा, मामा, हे तोतरे शब्द ऐकण्यात एक वेगळीच मजा आहे... रांगत तू जेंव्हा घरभर फिरतेस तेंव्हा तुझ्याकडे बघत बसावे वाटते... दिवसभर बाहेर कितीही थकून आलो तरी घरी तुझ्या हसतमुख चेहऱ्याकडे पहिले की सर्व शीण दूर होतो एवढी ताकत तुझ्या हास्यात आहे... आयुष्याच्या साऱ्या चिंता आणि जगाला विसरायला लावेल एवढी ताकत तुझ्या पैंजणाच्या किणकिणात आहे...
           एक बाहुली, परी, फुलपाखरू.... काय उपमा देऊ तुला चिमू... पाहता पाहता एक वर्षाची झालीस... आमच्या घरातील चैतन्याच्या रूपातील तू अशीच हसत खिदळत मोठी होत राहा आणि आमच्या आनंदात भर टाकीत जा...