Thursday, 12 June 2014

आज वडाची पूजा कराच...!!!

       जेष्ठ महिन्यात येणारी पोर्णिमा हि वटपोर्णिमा या नावाने ओळखली जाते हि पोर्णिमा विशेष मानली जाते याची अनेक कारणे आहेत... यातील कोणतेही एक कारण निवडा आणि आज वडाची पूजा कराच. साधारणतः खालीलप्रमाणे वटपोर्णिमा हे व्रत महत्वपूर्ण व्रत असल्याची कारणे सांगता येतील....
 1. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया उपवास ठेवून व्रत करतात.
 2. या दिवशी वडाची आणि यमाची पूजा केली जाते.
 3. शतपत ब्राह्मण मध्ये वृक्षांना शिव आणि यजुर्वेद मध्ये शिवाला वृक्षांचा स्वामी म्हटले आहे.
 4. वडाच्या झाडाखालीच गतप्राण झालेल्या सत्यवानाला नवजीवन प्राप्त झाले होते.
 5. काही धर्मग्रंथांच्या मते वडाच्या झाडांच्या मुळामध्ये ब्रह्मा, खोडांमध्ये विष्णू आणि पानांमध्ये शिवाचा वास असतो.
 6. वडाच्या झाडाला देववृक्ष म्हटले जाते.
 7. एक पौराणिक कथा अशीही आहे की जेंव्हा मार्केंडेय ऋषींनी देवाला दर्शन देण्याची याचना केली तेंव्हा देवाने प्रलयाचे दृश्य दाखवून वडाच्या झाडाच्या पानांमध्ये पायाचा अंगठा चोखत असतानाचे बाळ रुपात दर्शन दिले.
 8. वनवासात असताना श्रीरामाने कुंभज ऋषींच्या सांगण्यावरून पंचवटीला निवास करणे पसंत केले.
 9. पंचवटी म्हणजे पाच वडांच्या सहाय्याने तयार झालेले स्थान होय.
 10. आयुर्वेदात वडाला अत्यंत महत्वपूर्ण मानले जाते कारण आयुर्वेदात केल्या जाणार्या उपचारांमध्ये याचे पाचही अंग (मूळ, खोड, पान, फुल आणि फळ ) उपयोगात येतात.
 11. अथर्ववेदानुसार पर्यावरणाची शुद्धी जल, वायू आणि वनस्पती यावर अवलंबून असते आणि वटवृक्ष वातावरणातील शीतलता आणि शुद्धता टिकवून ठेवतो. 
 12. दशपुत्रास्मो द्रुम: (अर्थात एक वृक्ष हा दहा पुत्रांच्या समान असतो.) या शब्दात वृक्षांचे महत्व मस्त्यपुराणातही सांगितलेले आहे.
 13. यासारखे बरेचसे दृष्टांत वडाच्या झाडाचे अध्यात्मीक महत्व किती आहे हे दाखवून देतात. धार्मिक गोष्टी मानायच्या की नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घ्यावे.
 14. प्रकाशाच्या मदतीने वृक्ष हे प्राणवायू तयार करतात आणि आपणास ऑक्सिजन रुपी जीवनशक्ती पुरवतात.
 15. वृक्ष स्वतः कार्बनडायाॅक्साइड रुपी विष प्राशन करून  ऑक्सिजनरुपी अमृत पुरवतात.
 16. वडाचे  झाड सर्वात जास्त कार्बनडायाॅक्साइड  घेऊन ऑक्सिजन सोडते.
 17. वृक्षांमुळेच धरतीवर जीवन टिकून आहे. 
 18. वटपोर्णिमेचे व्रत हे आपणा सर्वांना पर्यावरणाशी जोडते. 
 19. हे वृत आपणास पर्यावरणाप्रती जागरूक होण्याचा आणि वृक्षांना वाचवण्याचा कल्याणकारी संदेश देते. 
                            वरीलपैकी कोणतेही एक कारण घ्या आणि आज स्त्रियांसोबत पुरुषांनीही वडाची पूजा कराच... कारण आज सर्वांनी केलेली हीच पूजा ते झाड तोडताना आपणास आठवेल आणि वृक्षांचा अंधाधुंद विनाश थांबला जाईल अन्यथा पृथ्वीवरचे हे जीवन संपण्यासाठी वेळ लागणार नाही मग ना कुठलाही पुरुष राहील ना कुठली पतिव्रता...!!!

No comments:

Post a Comment