Thursday, 8 May 2014

मुलगी झाली हो ...!!!

 

मुलगी झाली हो ...!!!

 

         लग्नानंतर दोघांमध्ये बर्याच बाबतीत एकमत असते तर बर्याच बाबतीत मतभिन्नता मीही याला अपवाद नाही... माझ्या बायकोत आणि माझ्यात एका गोष्टीत मतभिन्नता झाली ती म्हणजे मला मुलगा हवा होता... माझ्याशी क्रिकेट खेळायला, माझ्याशी स्पर्धा करायला, माझी बाजू घ्यायला, आणि त्याच्यामध्ये मला माझं बालपण जगायला... आणि तिला मात्र मुलगी हवी होती तिच्याशी मस्ती करायला, तिला नटवायला, तिला सजवायला, इ.
         १ एप्रिल २००९ रोजी मला मुलगा झाला आणि त्याचे नाव मी अंतरीक्ष असे ठेवले तशी तीही फार खुश होती एक सुंदर, चंचल आणि चपळ मुलाला जन्म दिल्यामुळे आणि हो आपल्या नवर्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे सुधा....
         अंतरीक्ष आता ५ वर्षाचा झालाय... तो छान बोलतो अगदी ऐकत राहावे असे वाटते... सांगेल तसे तो करतो एक शब्दही कधी खाली पडू देत नाही. त्याने कराटे क्लासही जॉईन केला आहे ६ ते ८ या वयोगटात थाई-बॉक्षिंग या प्रकारात तो स्पर्धेतही उतरतो आणि खेळून जिंकतोसुद्धा... अंतरीक्ष मुळे मी माझे बालपण जगू लागलो त्याच्याशी खेळू लागलो, स्पर्धा करू लागलो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा आमच्या तिघांमध्ये त्याला  त्याचे मत मांडण्याची वेळ येते तेव्हा तो माझी बाजू घेतो....
         आणि आता वेळ होती परीक्षेची... आता काय होईल याची चिंता वाटू लागली होती... आता काय हवे असे जवळच्या नातेवाईकांनी किंवा मित्रमंडळीनी विचारले की आपल्याला काही नाही काहीही झाले तरी चालते असे सांगायचे पण मनोमन कुठेतरी सुप्त इच्छा होती की आपल्यालाही एक मुलगी हवीच... का कोणास ठाऊक पण मनोमन असे वाटायचे की यावेळी मुलगीच होणार....
         आणि तो दिवस उजाडला अखेर १४/०४/१४ या दिवशी मला मुलगी झाल्याचा मला फोन आला (कारण माझे निवडणूक अधिकारी म्हणून प्रमोशन(??) झाले होते न...!!!) मुलाच्या वेळी मी जसा लवकरात लवकर तिच्याजवळ पोहचलो होतो तसे मात्र यावेळी मला जाता आले नाही... अखेर निवडणुकीची सर्व जबाबदारी व्यवस्थित पार पडून मी सहाव्या दिवशी मुलीला पाहायला गेलो...
         जेव्हा मी मुलीला पाहिले  त्यावेळी ती हाताच्या मुठी आवळून आणि डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत होती... जणू काही ती मला विचारात होती की आता वेळ मिळाला होय... आता माझी आई एकटी नाही हं... मी आले आहे आता... माझी बायको माझ्या मुलीकडे पाहत होती... मुलगी माझ्याकडे पाहत होती... आणि मी बायकोकडे पाहत होतो... किती खुश आहे  ती... अखेर तिची इच्छा आज पूर्ण झाली आहे... क्षितिजा आली आहे...

खरच आज ओरडून सगळ्यांना संगावेशे वाटते की मला मुलगी झाली हो...!!!

No comments:

Post a Comment