Monday, 6 January 2014

आदर्श प्राथमिक शाळा बिदाल पुनर्वसन
या शाळेत गेल्यावर एखाद्या खाजगी इंग्लीश शाळेला देखील लाजवेल असे वातावरण पाहायला मिळाले या शाळेतील शिक्षक श्री संजीवन जगदाळे यांनी अतिशय मेहनतीने या शाळेचे वातावरण तयार केले आहे. या शाळेत इंटरनेटचे कनेक्शन असून प्रोजेक्टर द्वारे विध्यार्थ्यांना शिकवले जाते. या शाळेत असणारा बायोगॅस प्रकल्प हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून या शाळेतील शालेय पोषण आहार या बायोगॅस द्वारे शिजवला जातो हे विशेष. शाळेची रंगरंगोटी, सजावट, गुणवत्ता याविषयी काय बोलावे जे प्रत्यक्ष पहिले ते शब्दात वर्णन करणे फार अवघड आहे सर्वांनी आवर्जून भेट द्यावी अशी माण तालुक्यातील एक आदर्श शाळा असेच वर्णन या शाळेचे करावे लागेल. या शाळेच्या विकासात जगदाळे सरांनी लोकसहभाग मिळवून शाळेचा कायापालट घडवून आणला आहे यामध्ये डॉ. सुरेश जगदाळे,(सिव्हील सर्जन सातारा), मेघदूत मदने (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष), एस. एन. फडतरे (टेलर) प्रतापराव भोसले, बिदाल गावचे सरपंच, उपसरपंच यांचे सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या शाळेकडे संपूर्ण तालुका एक ROLL MODEL म्हणून पाहत आहे. जगदाळे सरांकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मीही त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे... सर्वांसाठी त्यांचा फोन नं. मी येथे देत आहे ९८६०७१४०४०

No comments:

Post a Comment