Monday, 6 January 2014

!!! एक नवी जिम्मेदारी !!!

विध्यार्थी हे दैवत माझे 
माझा विश्वास असे ...
प्रत्येकाचे रूप मनोहर
घडविण्या मी सज्ज असे ... 
माण तालुक्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी माझ्या मार्डी केंद्रातून माझी निवड करण्यात आली. हा पुरस्कार तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे, पंचायत समिती सभापती श्रीरामभाऊ माने पाटील, उपसभापती वसंतराव जगताप, गटविकास अधिकारी श्रीम. सीमा जगताप यांच्या हस्ते पुरस्काररूपी नवी जिम्मेदारी मी स्वीकारली आहे.... हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी करत असलेले काम अधिक चांगल्या पद्धतीने करावे यासाठीच हा कौतुक सोहळा आहे याची मला पूर्ण जाणीव आहे... माझ्या केंद्रातील सर्व शिक्षक व माझा सर्व मित्र परिवार यांच्या सहकार्याने मी माझी हि नवी जिम्मेदारी मी सहज पार पडू शकेन याचा मला पूर्ण विश्वास आहे.... कारण माझे केंद्रप्रमुख श्री दारासिंग निकाळजे, विस्तार अधिकारी श्री लक्ष्मनराव पिसे साहेब, व गटशिक्षणाधिकारी श्री. वामनराव जगदाळे साहेब यांची माझ्या पाठीवर असणारी थाप मला नेहमीच नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा, उर्जा, आणि बळ देत असते....
हो विफल क्यो साधना,
जब आराधना परिपूर्ण हो...
हो विफल क्यो यज्ञ कोई,
जब प्रार्थना परिपूर्ण हो.....
अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश सर्वत्र पोहोचविण्यासाठी सुरु केलेला यज्ञ सफल होण्यासाठी सर्व काही करण्याची तयारी ठेऊन वाटचाल सुरु आहे..... आतापर्यंत दिलेल्या साथीने व सहकार्याने मी आपल्या सर्वांचा सदैव कृतज्ञ व ऋणी आहे.... उत्तरोत्तर अशीच साथ मिळेल या अपेक्षेसह ....... राम सालगुडे

No comments:

Post a Comment