Tuesday, 3 December 2013

कट्टा शिक्षणाचा

पूर्वीची माणसे संध्याकाळच्या वेळेला निवांत गप्पा मारण्यासाठी पारावर जमत असत आणि माझ्या शेतात काय तुझ्या शेतात काय ....कुठले बियाणे वापरणे चांगले .... कुठले औषध वाप्ररावे .... कुठली नवीन पद्धती वापरावी .... याविषयी सविस्तर चर्चा होऊन विचारविनिमय व्हायचा आणि एकमेकंच्या कल्पनांची देवाणघेवाण व्हायची ...... पुढे कॉलेज कट्टा हा शब्द अस्तित्वात आला आणि तेथेही याच
धर्तीवर एकमेकांच्या कल्पना शेअर होऊ लागल्या अर्थातच त्या कात्त्यांचे विषय वेगळे होते....... रात्रीच्या वेळी बस्टॅड समोर उभा राहून चहा घेत असताना उगीच सर्वांची मापे काढणारा कट्टा हि मी पहिला आहे...... पण.....
दि.२५/११/२०१३ रोजी एक असा कट्टा पहिला जो कट्टा गेल्या अडीच वर्षापासून रंगत आहे या कट्ट्याचा विषय फक्त शैक्षणिक आहे शिक्षणातील नवीन प्रयोग ,बदल, आणि प्रवाह याविषयी येथे नुसती चर्चाच होत नाही तर शिक्षण कट्ट्याचं निमित्ताने शिक्षणप्रेमींना समृद्ध होता येते एव्हढेच नाही तर हा कट्टा परिषदा आयोजित करतो, चर्चासत्रे घडवून आणतो, शिक्षकांसाठी राज्यव्यापी साहित्य संमेलन भरवतो, जो कट्टा काही जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेतो, जो कट्टा शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी काय करता येईल ते सर्व करण्याची तयारी दाखवतो.... जो कट्टा उपक्रमशील शिक्षकांना नुसते एकत्रच आणत नाही तर त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचे उपक्रम इत्रांच्यापर्यंत कसे पोहोचतील याची आखणी करतो.... आणि ज्या कट्ट्याची दखल शासनालाही घेणे भाग पडते असा कट्टा मला जवळून पाहण्याची, अनुभवण्याची, सहभागी होण्याची, विचार व्यक्त करण्याची संधी मिळाली आणि तीही थेट या कट्ट्याच्या संयोजाकाकडून .....किती भाग्य म्हणावे..... या कट्ट्याच्या सभासदांबरोबर वेळ कसा गेला आणि मीही या कट्ट्याचा एक कट्टेकरी कधी झालो हे माझे मलाही कळले नाही..... एका विधायक कट्ट्याचा कट्टेकरी..... ज्यांनी होण्याची संधी दिली त्या जेष्ठ आणि संयोजक कट्टेक-याचा सदैव ऋणी........(या कट्ट्याचे संयोजक आदरणीय श्री वसंत काळपांडे सर आहेत हे वेगळे सांगायला नको.... यांच्याविषयी सविस्तर लिहिणार आहे....)

No comments:

Post a Comment