Sunday, 24 November 2013

E-Learning

           आजचे युग हे संगणकाचे युग आहे. माहितीयुग म्हणूनही ते ओळखले जाते. या काळात आपली शिक्षणपद्धत कात टाकत आहे. शिक्षक, शिक्षणतज्ञ व एकूणच सर्वांना पुढील काळात स्वत:मद्ध्ये खूप बदल करावे लागणार आहेत. पास्चात्त्य देशात शैक्षणिक तंत्रज्ञानात खूप वेगाने बदल होत आहेत. या बदलांची चाहूल smartboard च्या रूपाने आपल्याला झाली आहे. इंटरनेटचा वापर घरी, शाळेत होऊ लागला आहे. youtube वरील व्हिडीओज दाखवून अध्यापन अधिक मनोरंजक, सखोल करावे लाहणार आहे. www.youtube.com/education वर आपल्याला भरपूर शैक्षणिक व्हिडीओज सापडतील.
         पाश्चात्त्य देशातील शैक्षणिक तंत्रज्ञानात होणारे बदल आपल्याला www.emergingedtech.com वर बघता येतील. khanacademy प्रमाणे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी raviacademy.org ही वेबसाईट सुरू झाली आहे. आता खूपजणांकडे android phones आहेत. त्यावर storycreator हे app तुम्ही डाऊनलोड करून घेतले तर विद्यार्थ्याना digital स्वरूपात धडे शिकवू शकता. प्रश्न आहे तो एवढाच की बदलत्या काळाचे आव्हान पेलण्यास आपण तयार व सक्षम आहोत का? 
रविचंद्र माने, रहिमतपूर 
(मो. नं. ९९७५१६९५४३)