Thursday, 31 October 2013

भाषा टिकवण्यासाठी


शुद्धलेखन-अशुद्धलेखन यासंदर्भात  आजच्या पिढीवर मोठी टीका होते. ऱ्हस्व-दीर्घ योग्य पद्धतीने लिहिता आलं तर छानच नाही तर त्यामुळे अडत काहीच नाही. वयाच्या पाचव्या आणि सहाव्या वर्षांपासून कम्प्युटरवर लिहायला सुरुवात केल्यावर बिचारा कम्प्युटरच आमचं स्पेलिंग सुधारायला शिकला. शाळेमध्ये स्पेलिंग चुकल्याने मार्क जातात एवढंच  आमच्यासाठी महतवाचे  त्या मार्काच्या मागे धावता-धावता भाषेचं सौंदर्य जपणं काय असतं हेच आम्हाला कधी कळलं नाही.

 एखादी भाषा वापरायला जेवढी सोपी तेवढी ती वापरण्याचं प्रमाण जास्त असतं. संस्कृतप्रचुर मराठीपासून आजची तरुण पिढीची मराठी असा बराच मोठा आणि थक्क करणारा प्रवास या भाषेने केलाय. संस्कृतप्रचुर मराठी आता वापरात नाही म्हणून आक्षेप घेतला जात नाही. मग मराठी बोलताना किंवा लिहिताना इंग्रजी आणि हिंदी शब्द वापरून भाषा जर प्रवाही रूप धारण करत असेल तर तिला असं का अडवायचं? भाषेचा इतिहास तर असं सांगतो की भाषा ही कोणा एकाची किंवा कोणत्या एकाच ठिकाणावरूनची नसतेच मुळी. वापरणाऱ्या लोकांच्या प्रमाणे त्यात  भेसळ होत जाते. 


 आजच्या पिढीला हे भाषेचं सौंदर्य समजावून देण्यासाठी प्रयत्न केला आहे? योग्य स्पेलिंग्ज आणि शुद्धलेखनामुळे भाषेचं सौंदर्य जोपासलं जातं हा विचार पटत नाही.  सणांना तर हटकून मराठी एसएमएस फॉरवर्ड केले जातात. नॉन मराठी मंडळीही खास मराठी एसएमएस पाठवतात. भाषा शुद्ध असावी ही इच्छा आम्हाला मान्य आहे पण तो जेव्हा अतिआग्रह होतो तेव्हा त्यापासून पळ काढण्याचे मार्ग शोधले जातात. म्हणजे मराठी भाषा बोलायची असेल तर शुद्धच बोला नाही तर बोलू नका अशी अट जर घातली तर मराठी न बोलण्याचा पर्याय स्वीकारला जाईल.

मराठी भाषा व्यवहारातून नामशेष होऊ नये यासाठी आमच्या पिढीकडून थोडे अधिक प्रयत्न व्हायला हवेत हे मान्य. थोडे वाचनसंस्कार पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवायला हवेत. पण यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक आहे. भाषा टिकवण्यासाठी केवळ आग्रह आणि अट्टहास उपयोगाचे नाहीत.


हेमंत भोसले
सौजन्य : mahanews

आजचा सुविचार

जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

आजची बोधकथा

एक धनिक सेठ आपल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी दररोज मंदिरात जात असे आणि सोन्याचे ताटात पुजेची सामग्री ईश्वराला समर्पित करत असे. ईश्वर प्रसन्न होईल या आशेने त्याने हे दीर्घकाळ केले. मात्र तसे झाले नाही, एके दिवशी त्याला मंदिरात जीर्ण कपड्यामध्ये एक व्यक्ती दिसली, ती ईश्वराला म्हणत होती,"हे ईश्वरा! तुझे लाख लाख आभार ! मी तुझ्या कृपेने सुखी झोपत आहे माझा कोणी शत्रू नाही आणि मला कसला त्रास नाही. माझ्यावर सदैव अशीच कृपा असू दे." घरी आल्यावर हि सेठला त्या व्यक्तीची गोष्ट आठवत होती कि ईश्वराला दररोज बहुमूल्य उपहार अर्पण करून त्याचे कष्ट कमी होत नव्हते मग तो गरीब ईश्वराला काहीही न देता इतका सुखी कसा? बराच विचार करून सेठ आपल्या दु:खाचे आणि गरीब माणसाच्या सुखाचे कारण शोधण्यासाठी संतांकडे गेला संत त्याची गोष्ट ऐकून म्हणाले, "सेठजी! आपण ज्या प्रमाणे सामान्य माणसाला प्रसन्न करतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा प्रसन्न करायचे बघत आहात. मात्र गरीब माणसाने आपल्या हृदयात त्या ईश्वराला साठवून ठेवले आहे. तो ईश्वराकडे काही अपेक्षा घेवून जात नाही. तर निरपेक्ष भावनेने देवाचे आभार मानत आहे. ज्यादिवशी आपला ईश्वराबाबतचा भाव बदलेल त्यादिवशी तुला ईश्वराचे दर्शन होईल. 

तात्पर्य-

 ईश्वराशी सदैव नि:स्वार्थी भक्तीभाव असावा; सुख आणि मनशांती निश्चित मिळते

 
आता आपल्या शाळेचा CODE अपोआप तयार होईल..तो लिहून ठेवावा. नंतर खालील प्रकारे तक्त्याच्या स्वरूपात DDO ,DDO LVL २,DDO LVL ३, LVL ४ अश्या HIERCHY LEVEL मध्ये माहिती दिसेल ..
CODE वर CLICK केल्यानंतर  त्या खाली तो कुठल्या शाळेचा आहे ,ते नाव दिसेल.. अश्या प्रकारे सर्व शाळांचे CODE तयार करायचे आहेत.  हा CODE USER NAME मध्ये उपयोगात येणार आहे.  
शाळेचा USER NAME = CODE _AST 


आणि मग  प्रणाली मध्ये माहिती भरावयाची आहे....
टप्पा २ सुरु ..